" Covid--19 सह आयुष्याचे रंग "

audiobook (Unabridged)

By VIJAY WAGHELA

cover image of " Covid--19 सह आयुष्याचे रंग "
Audiobook icon Visual indication that the title is an audiobook

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

आपण कौटुंबिक माणसं , कुटुंब घेऊन जगणारी माणसं , म्हणजेच कौटुंबिक समस्या घेऊन जगणारी माणसं . समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन जगणारी माणसं . नकळतपणे विसरतो की अपेक्षा मागे ठेवूनच या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे . कदाचित यालाच जीवनचक्र म्हणावं लागेल .

जीवन प्रवाहात प्रवाहीत असताना निरपेक्षपणे जीवन व्यतीत करणा-या काही पुण्यात्म्यांचा स्पर्श आपल्या नळतपणे आपल्याला होत असतो . अशावेळी आपण जर आपले विचार बुद्धी , चारित्र्य यांची शुचिता ठेवून मार्गक्रमण करीत असलो तरच आपल्याला त्या परिस स्पर्शाची जाणीव होत असते . अन्यथा आपण आयुष्याने दिलेल्या एका अनोख्या मेजवानीला मुकतो .

अशीच एक मेजवानी कोरोनानं आपल्याला दिली . आपल्या आजुबाजूच्या व्यक्तिंच्या अंतर्मनात डोकावण्याची . खरंतर कोणाच्या अंतर्मनात घुसून प्रवास करणं एवढं सोपं नसतं . पण प्रवास सुरू झाला आणि आवड निर्माण झाली तर मात्र हा प्रवास कधीच संपू नये असं वाटतं , किंबहुना आपला लांब पल्ल्याचा झालेला प्रवास सुद्धा आत्ता कुठं सुरू झालाय असं वाटतं . कदाचित हे वाटणंच मृत्यू नंतर सुद्धा जगण्याची आशा दाखवत असावं . मृत्यू म्हणजे शेवट नाही यावर शिक्कामोर्तब करत असावं .

कोरोनाच्या मृत्यू शय्येवर जाऊन परत आलेल्या प्रत्येकाला हे सत्य जाणवलेलं असावं . खरंतर या कोरोना कालावधीमध्ये खूप खूप जणांनी खूप खूप जणांच्या अंतर्मनात कळत नकळतपणे प्रवास केला असावा असं वाटतं . म्हणूनच या काव्यसंग्रहास " Covid - 19 सह आयुष्याचे रंग " हे नाव योग्य वाटलं .

श्री . विजय मनसुख वाघेला

" Covid--19 सह आयुष्याचे रंग "